spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; लग्नास टाळाटाळ

– कामठीत खळबळ; आरोपीचा शोध सुरू, नवीन कामठी पोलिसांत गुन्हा दाखल

कामठी :- लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच नंतर लग्न करण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार कामठी शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार असल्याने त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकुश संतोष नेताम (२१, रा. लुंबिनी नगर, कामठी) असे नाव आहे. कामठी-नागपूर मार्गावरील भीलगाव नाका परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणीशी आरोपीची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तरुणीने लग्नाबाबत तगादा लावल्यानंतर आरोपी टाळाटाळ करू लागला. दोन दिवसांपूर्वी तरुणी आपल्या आईसोबत आरोपीच्या घरी गेली असता, लग्नाबाबत विचारणा केली. मात्र आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर तरुणीने सोमवारी (दि. १०) पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे कामठी (नवीन) पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेतील कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सृष्टी कदम करीत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Popular Articles