spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांच्या तत्परतेने तेलगू हायस्कूलच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला!

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती मनस्वी संदीप गिऱ्हे यांनी आज सकाळी ११:०० वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी तेलगू हायस्कूल, मनपा चंद्रपूर येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेतला.

भेट देण्यादरम्यान, शाळेची पिण्याच्या पाण्याची टाकी अचानक खराब झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाल्याची बाब शिक्षकांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिली. विषयाचे गांभीर्य ओळखून मनस्वी गिऱ्हे यांनी तात्काळ प्रशासनास निर्देश दिले. सभापतींच्या या सूचनेनुसार आजच शाळेत नवीन पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावला आहे.

या संवेदनशील कार्यपद्धतीमुळे शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, मनपाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.