spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मध्य नागपुरातील शाळांनी केला राष्ट्रभक्तीचा जागर ! 

– राष्ट्रजागृती प्रतिष्ठान द्वारे आमदार चषक देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे उत्साहात आयोजन  

नागपूर :- राष्ट्रजागृती प्रतिष्ठान व आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती मध्य नागपूर द्वारे मध्य नागपुरातील शालेय विद्यार्थ्यांची आमदार चषक देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन मंगळवार दि ११ ऑगस्ट २०२६ रोजी शिक्षक सहकारी बँक सभागृह येथे उत्साहात संपन्न होऊन मध्य नागपुरातील २९ शाळांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन राष्ट्रभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून सहभाग घेतला.

स्पर्धेचे उध्द्दाटन सुधीर दप्तरी यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार गिरीश व्यास, संगीत तज्ञ डॉ अंजुषा पांडवकर, वैशाली पाध्ये, शिक्षक आघाडी अध्यक्ष राजकुमार कनाटे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेची संकल्पना आमदार प्रवीण दटके यांची असून शालेय विद्यार्थ्यांना व युवा पिढीला भारताचा गौरवशाली इतिहास माहिती व्हावा तसेच जागरूकता निर्माण करून राष्ट्रीय चेतना व देशभक्ती जागृत व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल, आदर्श प्राथमिक शाळा, रमेश चांडक स्कूल, प्रबोधन कॉन्वेंट, जी जी सारडा इंग्लिश हायस्कूल, उमियाशंकर नारायण स्कूल, या शाळांनी उत्तम सादरीकरणाने लोकांची मने जिंकली. या समूह गीत स्पर्धेतून ३ उत्तम शाळांची निवड करण्यात आली. बक्षीस वितरण सोहळा भारत सरकारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता अयाचित मंदिर चौक महाल येथे संपन्न होणार आहे.स्पर्धेची संकल्पना आमदार प्रवीण दटके यांची असून या कार्यक्रमासाठी राष्ट्रजागृतीचे प्रतिष्ठान चे अध्यक्ष संजय चिंचोले, जयंत पाध्ये, डॉ श्रीरंग वराडपांडे, आशिष भुते, नीरजा पाटील, भूषण घुई, मंगेश वड्याळकर, पंकज साळुंके, राजश्री गोरे, सदाशिव देहद्राय, सचिन कावळे, कुणाल गडेकर, आदी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

Popular Articles