spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महसूल मंत्री बावनकुळे यांच्याबाबतच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी करा

– मनोज जरांगे पाटील यांच्यावर कारवाईची मागणी; नगराध्यक्ष पीयूष बुरडे यांच्या नेतृत्वाखाली खापा पोलिसांना निवेदन

खापा, वार्ताहर :-  महसूल मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून कथितरीत्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कायद्याचे उल्लंघन आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

नगराध्यक्ष पीयूष राजेंद्र बुरडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने यासंदर्भात खापा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जंगम यांना निवेदन सादर केले. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींविषयी वक्तव्य करताना भाषेची मर्यादा, संयम व सामाजिक जबाबदारीचे भान राखणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

संबंधित वक्तव्याचा नेमका संदर्भ, सत्यता आणि कायदेशीर बाबींची निष्पक्षपणे पडताळणी करूनच पुढील निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा, यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

यावेळी नगरसेवक रवि परतेकी, किशोर आष्टनकर, निखिल आष्टनकर, पुष्पेंद्र (मुन्ना) शर्मा, सामाजिक कार्यकर्ते आनंद मेनकुदळे, चंद्रकांत लिखार, विजय कठौते यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.