spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महावितरणची तत्परता; सार्वजनिक बांघकाम विभागाने क्षतीग्रस्त केलेल्या भूमिगत वाहिनी दुरुस्तीचे काम आज

नागपूर :- शहरातील विकास कामांना गती देतानाच ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीज सेवा मिळावी, यासाठी महावितरण नेहमीच कटिबद्ध आहे. याच उत्तरदायित्वाची जपणूक करत, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फत तुळशीबाग येथे सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या कामादरम्यान 33/11 केव्ही मॉडेल मिल उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या 11 केव्ही दक्षिणामूर्ती आणि 11 केव्ही महाल-1 या भूमिगत वाहिन्या क्षतीग्रस्त झाल्या आहेत. महावितरणने तत्परता दाखवित या वाहिन्या दुरुस्तीचे काम गुरुवार दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात करण्याचे नियोजन केले आहे.

या क्षतीग्रस्त वाहिन्यांमुळे भविष्यात कोणतीही मोठी तांत्रिक अडचण येऊ नये आणि ग्राहकांना अखंड वीज पुरवठा लाभावा, यासाठी या वाहिन्यांची तातडीने व अत्यंत सुरक्षितपणे दुरुस्ती करण्याचे महत्त्वपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी, गुरुवार, 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या वाहिनीवरील वीज पुरवठा तात्पुरता थांबविण्यात येणार आहे. या कामांमुळे दक्षिणामूर्ती चौक, महाल बडकस चौक, कुंभारपुरा परिसर, गजानन मंदिर परिसर, गांधी पुतला, आयचीत मंदिर चौक, दरोडकर चौक परिसर, झेंडा चौक गणेशपेठ, कर्नल बाग, जोग गल्ली, दसरा रोड, महाल, कोठी रोड, उपाध्याय रोड, गाडीखाना आणि लकडापूल या परिसरातील वीज पुरवठा बंद राहील.

शहराच्या विकासाच्या या कामात आणि दुरुस्तीच्या या चार तासांच्या कालावधीत सर्व सम्मानित वीज ग्राहकांनी महावितरणला नेहमीप्रमाणे आपले सहकार्य द्यावे, ग्राहकांना होणाऱ्या असुविधेबद्दल महावितरणने मनापासून दिलगिरी व्यक्त करीत ग्राहकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.