spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वप्नपूर्ती’ प्रकल्पातील ५१८ ई डब्ल्यू एस सदनिकांसाठी महापौर निता ठाकरे यांच्याहस्ते आज सोडत

– पंतप्रधान आवास योजना (शहर)२.०

नागपूर :- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)- २.० अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मौजा-नारी येथे उभारण्यात येत असलेल्या ५१८ ईडब्ल्यूएस सदनिकांच्या ‘स्वप्नपूर्ती’ प्रकल्पाची संगणकीय सोडत (Lottery) आज महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते आज ता.१३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे हा संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

याप्रसंगी खासदार माया इवनाते, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार कृपाल तुमाने, आमदार संजय भेंडे, आमदार राजीव पोद्दार, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास ठाकरे, आमदार मोहन मते, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेता संजय महाकाळकर, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त अंकित, मुरुगनंथम एम. मिलिंद मेश्राम, एमआयएमचे गटनेता शकील पटेल, मुस्लिम लिगचे गटनेता असलम मुल्ला खान, शिवसेना (उबाठा) गटनेता किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या आभा पांडे, बसपाच्या गटनेत्या हर्षला जयस्वाल, शिवसेनेचे गटनेता गणेश चर्लेवार, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घर बांधणी विशेष समिती सभापती रूतीका मसराम, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती अश्विनी जिचकार, दुर्बल घटक समिती सभापती लक्ष्मी हत्तीठेले उपस्थित राहणार आहे.

सर्वसामान्यांचे हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनपातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक क्र. २ (AHP) अंतर्गत या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पात एकूण ५१८ ईडब्ल्यूएस सदनिकांचा समावेश असून त्यांची रचना खालीलप्रमाणे आहे:

 २ BHK सदनिका: ४५ चौ.मी. चटई क्षेत्रफळ असलेल्या एकूण ३०८ सदनिका

१ BHK सदनिका: ३० चौ.मी. चटई क्षेत्रफळ असलेल्या एकूण २१० सदनिका.

विशेष म्हणजे, यामध्ये दिव्यांग प्रवर्गातील नागरिकांकरिता ५% समांतर आरक्षण ठेवण्यात आले असून त्याअंतर्गत एकूण २६ सदनिका आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्यासाठी या प्रकल्पाचे मूल्य अत्यंत आकर्षक ठेवण्यात आले आहे, यात १ BHK सदनिका: प्रति सदनिका किंमत रु. १५.५२ लक्ष. यामध्ये शासनाचे रु. २.५ लक्ष अनुदान वजा केल्यास नागरिकांना ही सदनिका केवळ रु. १३.०२ लक्ष या दरात उपलब्ध होणार आहे. २ BHK सदनिका: प्रति सदनिका किंमत रु. २१.०२ लक्ष. यामध्ये शासनाचे अनुदान वजा केल्यास नागरिकांना ही सदनिका रु. १८.५२ लक्ष या राशीला उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पातील सदनिकांसाठी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. नागरिकांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद लाभला असून एकूण १,९१९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व प्राप्त अर्जांमधून आज महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते संगणकीय पद्धतीने पारदर्शक ‘लॉटरी’ काढून ५१८ भाग्यवान अर्जदारांची निवड केली जाणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.