spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मौदा येथे तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

किशोर साहू, मौदा :- हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने मौदा येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा आणि राष्ट्राभिमानाचा प्रतीक असून, या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला एकत्र आणणारी ‘हर घर तिरंगा’ आणि ‘तिरंगा रॅली’ ही संकल्पना देऊन संपूर्ण देशात राष्ट्रभक्तीची अभूतपूर्व भावना निर्माण केली आहे. या रॅलीला नागरिक आणि तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सशक्त राष्ट्र घडविण्याच्या या संकल्पनेत सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन याप्रसंगी उपस्थितांना केले.

यावेळी विधानपरिषद आमदार डॉ. राजीव पोद्दार, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद राऊत, माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा जिल्हा महामंत्री अनिल निदान, राहुल किरपाण, भाजपा जिल्हा महिला अध्यक्ष प्रीति मानमोडे, भाजपा मौदा तालुका अध्यक्ष भगवान बावनकुळे, भाजपा मौदा तालुका प्रभारी तथा तालुका समन्वय समिती अध्यक्ष नरेश मोटघरे,मौदा शहराध्यक्ष रमेश कुंभलकर, चाचेर मंडळ अध्यक्ष रवींद्र चव्हाण, नगराध्यक्ष नगरपंचायत मौदा प्रसन्ना (राजाभाऊ) तिडके, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष चेतन खडसे, उपाध्यक्ष वीरेंद्र पायतोडे, माजी भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल, माजी जि प सदस्या राधा मुकेश अग्रवाल तसेच नगरसेवक मोरेश्वर सोरते, राहुल पोटभरे,उमेश गभणे, श् राजू सोमनाथे, नगरसेविका पद्मावती चलसानी, श्रीमती पोटभरे, तहसीलदार निंबाळकर, गटविकास अधिकारी बहेकर, नगरपरिषद मुख्याधिकारी मेश्राम यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles