spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गांगनेर (हिवरा )ते खंडाळा (गांगनेर) दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढवा – उपसरपंच मोतीराम घरजाळे 

किशोर साहू, मौदा :- गांगणेर ते खंडाळा दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील दोन वर्षांपूर्वीपासून अत्यंत कासव गतीने सुरू असून, रेल्वे पटऱ्यांची संख्या दोन वरून तीन झाल्याने वारंवार रेल्वे गाड्यांचे आवागमन सुरू राहत असल्याने रेल्वे फाटक वारंवार बंद राहत असते त्यामुळे या दोन्ही गावातील व परिसरातील आवागमन करणारे दुचाकी धारक,चारचाकी धारक वाहन चालकासह शेतकरी वर्ग अत्यंत त्रस्त आहे. त्यामुळे दोन महिन्यापूर्वीपासून बंद असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिज च्या कामाला सुरुवात करून कामाची गती वाढवून काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी गट ग्रामपंचायत गांगनेर (हिवरा) चे उपसरपंच मोतीराम घरजाळे यांनी केली आहे.

Popular Articles