spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वातंत्रदिनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

– विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय समारंभ

नागपूर :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात शनिवार, दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 09.05 वाजता आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर पालकमंत्री मंत्री बावनकुळे सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना स्विकारतील. त्यानंतर जनतेला उद्देशून संबोधित करतील. मुख्य शासकीय समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्य उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देवून पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तसेच विभागीय स्तरावरील राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात केलेल्या कार्याबद्दल विविध विभाग तसेच संस्था व व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम

स्वातंत्र्य दिनानिमित्त सायंकाळी 5.30 वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित रहावे असे, आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

Popular Articles