spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

१५ ऑगस्टनिमित्त बोरी व वाघबोडी येथील अंगणवाडीतील चिमुकल्यांना ड्रेस वाटप

किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील गट ग्रामपंचायत बोरी-घिवारीच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त या ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बोरी( घिवारी) व वाघबोडी येथील अंगणवाडीतील मुला-मुलींना ड्रेसचे वाटप करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी तसेच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. ड्रेस मिळाल्यानंतर अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद विशेष आकर्षण ठरला.

गावातील बालकांचे शिक्षण, आरोग्य, संस्कार आणि सर्वांगीण विकास यांना ग्रामपंचायतीचे सदैव प्राधान्य राहील. भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी आणि गावातील नागरिकांसाठी अशाच प्रकारचे लोकहिताचे उपक्रम राबविण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प असल्याचे सरपंच विशाल सेलोकर यांनी सांगितले.

याप्रसंगी सरपंच विशाल सेलोकर, उपसरपंच दिनेश पटले, ग्रामपंचायत अधिकारी वैभव बावनकर , सर्व ग्रामपंचायत सदस्यगण, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित राहून सर्वांनी सहकार्य केले.

Popular Articles