spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पवित्र श्रावण मासाच्या शुभारंभानिमित्त जल कलश यात्रेत सहभाग

कामठी :- पवित्र श्रावण मासाच्या शुभारंभानिमित्त कामठी येथील महादेव घाटावरून निघालेल्या जल कलश यात्रा सहभागी होऊन येरखेडा येथील श्री शिवपंचायत मंदिरात भगवान महादेवाची विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली.

यावेळी भगवान शिवाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच भगवान महादेवाचा आशीर्वाद घेत श्रावण मासाच्या पावन पर्वाला भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी श्री शिवपंचायत मंदिराच्या अध्यक्षा किशोरी भोयर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, अनुराधा भोयर पंढरी अंबाळकर, सरिता रंगारी,राजेश बनसिंगे, चंद्रशेखर बनसिंगे, भास्कर बनसिंगे, बबन काळे, अनिल मुपिडवार, बाबा पुंजरवार, देवराव सरोदे, छंगन गवते, दिवाकर कडू, रामचंद्र कुथे, धनराज वाघ, प्रविन भायदे यांच्यासह भाविक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रावण मास हा भगवान महादेवाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या पावन पर्वाच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी व आरोग्य नांदो, अशी प्रार्थना करण्यात आली.

Popular Articles