spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती व ग्रंथपाल दिवस उत्साहात  

– डाँ. एस. आर. रंगनाथन ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून त्यांची ओळख

सचिन चौरसिया, रामटेक :- विद्यासागर कला महाविद्यालयात बुधवार (दि.१२) रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती व राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश सोमकुवर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अर्थशास्त्र विभागाचे डॉ. विलास जयभाये म्हणुन उपस्थित होते. डॉ. विलास जायभाये यांनी आपल्या वक्तव्यामध्ये आज विद्यार्थ्यांना ” वाचन हे किती महत्त्वाचे आहे व या अफाट ज्ञानसागरात तसेच स्पर्धात्मक युगामध्ये जर आपल्याला टिकायचे असेल तर आज या पाठ्यपुस्तकांसोबत स्पर्धात्मक पुस्तकांचा देखील अभ्यास करणे खूप आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही आज जेवढं वाचन कराल तेवढा तुमच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सुधारणा होईल व एक तुम्ही सुंदर व्यक्तित्व म्हणून समाजात नावलौकिक होईल” असे विचार व्यक्त केले. ग्रंथालय प्रमुख डॉ. आशिष ठाणेकर यांनी केले. त्यांनी डॉ.एस.आर. रंगनाथन यांचा जीवनप्रवास उलगडवून दाखविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्कान ठाकूर हिने केले. तर आभार प्रदर्शन युगांती दुधपचारे हिने मानले. कार्यक्रमाला बी.ए. भाग एक, दोन व तीनचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. गिरीश सपाटे, डॉ.सावन धर्मपुरीवार, डॉ.ज्योती कवठे, डॉ. रवींद्र पानतावणे, डॉ. सतीश महल्ले, प्रा. गंगा मोंढे, प्रा. रणजीत वायसे, ग्रंथालय परिचर युनिस पठाण प्रामुख्याने उपस्थित होते.

ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून त्यांची ओळख

डाँ. एस. आर. रंगनाथन हे एक भारतीय गणितज्ञ आणि ग्रंथपाल समुदायाचे संस्थापक होते ज्यांनी कोलन वर्गीकरण आणि वर्गीकृत कॅटलॉग कोड विकसित केला. ते भारतात ग्रंथालयशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यात सक्रियपणे सहभागी होते. डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्म १२ ऑगस्ट १८१२ रोजी झाला. भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून त्यांची ओळख असून, महान गणितज्ञ व ग्रंथपाल म्हणून त्यांनी भारतातील वाचन संस्कृती आणि ग्रंथालय चळवळीला नवी दिशा दिली. त्यांचा जन्मदिवस देशभर ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो.

Popular Articles