spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शिष्यवृत्ती परीक्षेत स्पृहा शिनखेडेचे घवघवीत यश

– नागपूर पश्चिम तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात पाचवा क्रमांक

नागपूर :- रामदासपेठ येथील सोमलवार हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी स्पृहा तुषार शिनखेडे हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (UPS) 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने नागपूर पश्चिम तालुक्यात प्रथम क्रमांक, तर नागपूर जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. स्पृहाने यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. KBC ज्युनिअर सीझन-१७ मध्ये सहभागी होत तिने २५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली होती. तसेच विज्ञान विषयक विविध स्पर्धांमध्येही तिने सुवर्णपदक मिळविले आहे. या यशाबद्दल स्पृहाचे शाळेतील शिक्षक, आई- वडील, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून अभिनंदन होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत असून उच्च स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्पृहाच्या यशामुळे कुटुंबातील आनंदाचे निर्माण झाले आहेत.

Popular Articles