नागपूर :- 15 ऑगस्ट रोजी श्रीहरीनगर नंबर -2 व 3 मानेवाडा, नागपूर येथील, उद्यानात 80 वा, स्वतंत्र्य दिनानिमित्त समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील 36 वर्षापासून या उद्यानात झेंडावंदनाचा कार्यक्रम होत असतो. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी घनश्याम फुसे यांनी ध्वजारोहण केले. कार्यक्रमाचे पाहुणे सुरेश ऊरकूडे, शिवराम गुरनूले, विजय लोणारे, प्रमोद रामटेके उपस्थित होते. भाषणातून त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले. विठ्ठलराव घोडे यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले तर राजरतन कुंभारे यांनी नगरीतील उपस्थित नागरिकांना संविधानाच्या प्रतीचे वाटप केले. या कार्यक्रमाला प्रा.अशोक मंदे, रामदास कोल्हे, प्रवीण सुरकर, अशोक माहूरे, केशवराव बोपूलकर, सौ.आशा माहुरे, राजेश होरे, घनश्याम ढोले, नंदकिशोर शिंगणजूडे, सुशील दहीकर, रवींद्र नखाते, अशोक मंडपे, गणेश भारद्वाज, जानराव बारई, हरीश लाकडे, छोटू जगनाडे, आनंद सेलूकर, खाटके, कोहाड, प्रतीक लांजेवार व नगरीतील नागरिक उपस्थित होते.








