spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बेला येथील गणेशनगरीत वृक्षारोपण

बेला :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील पौनी रस्त्यावरील गणेश नगरीतील रहिवाशी नागरिकांनी उत्साहात वृक्षारोपण केले.यातून त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

हा पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प. शिक्षक सुनील जेवले,लोकजीवन विद्यालयाचे शिक्षक आशिष देशमुख,प्रमोद बारापात्रे,पवन लांडे, प्रकाश आंबटकर,विकास लांडे, तेलरांधे, शरद मोते, विनोद साठवणे यांनी परिश्रम घेतले. यावेळी नगरीतील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक चिंतामण मोते, चींधू आंबटकर, चींधू शस्त्रकार यांनी आवर्जून उपस्थित राहून तरुणांना मार्गदर्शन केले. वृक्षारोपणात बालगोपालांनी सुद्धा रोपांची लागवड केली. शुद्ध हवा आणि पर्यावरण समतोल राखण्यासाठी कडुनिंब, पिंपळ, वड ,उंबर, आंबा आणि इतर छायादार व फळांच्या देशी रोपांची लागवड करण्यात आली.

संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

केवळ झाडे लावून न थांबता, लावलेल्या प्रत्येक झाडाचे स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेण्याची व त्याच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची शपथ यावेळी उपस्थित नागरिकांनी घेतली. यातून त्यांनी प्रदूषणमुक्त आणि हरित भारत घडवण्याचा संकल्प केला. झाडे आपल्याला प्राणवायू देतात, म्हणूनच प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला किंवा इतर समारंभ प्रसंगी किमान एकतरी झाड आवर्जून लावले पाहिजे.असे मार्गदर्शन वृक्षारोपणासाठी पुढाकार घेणारे शिक्षक सुनील जेवळे यांनी व्यक्त केले. मिठाई वाटून वृक्षारोपण व स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करण्यात आला.

Popular Articles