हंसराज, गोबरवाही :- गोबरवाही पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे आष्टी येथील कोंबडा जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून १४ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ४ लाख ३६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस स्टेशन गोबरवाहीचे पोलीस निरीक्षक गिते यांनी ही कारवाई केली. आरोपींमध्ये मिनेंद्र हनवत शेंडे, मानेश्वर भागवत गोपाले, गुलाब रामा राऊत, सावन मनोहर गोपाले, दिपक नंदलाल गोपाले, मनिष कन्हैय्या भलावी, अजय राजेश गोपाले, विजय माधोवराव कोटेकर, सुरज दहराचंद भुरे, देवराज वाल्मीक कोहळे, चुडामणी छत्रपती परबते, ओमेश कवडुजी माहुले (म.प्र.), तुलाराम शंकर धनकरे (म.प्र.) यांचा समावेश आहे. तसेच बादल हेमराज नेवारे आणि संदेश अशोक शेंडे हे फरार असल्याचे सांगण्यात आले.
आरोपींकडून ५,३५० रुपये रोख, दोन जखमी कोंबडे, दोन लोखंडी काठ्या, तसेच ८ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.
या कारवाईला पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सदर गुन्हा क्रमांक ४२२/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(ब) खाली नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.





