spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तारुण्यातही होऊ शकतो अल्झायमर

अल्झायमर यासारखे आजार वृद्धापकाळातच होतात असे समज असतील तर हा समज चुकीचा आहे. यासाठी नवीन संशोधनातली माहिती वाचणं गरजेचं आहे.

वयाच्या पासष्टाव्या वर्षापूर्वी होणारा अल्झायमर हा वृद्धपकाळात उद्भवणाऱ्या अल्झायमरपेक्षा वेगळा असतो. या संशोधनानुसार, तरुण रुग्णांमधे आढळणारी लक्षणं आणि आरोग्याच्या समस्या या वृद्ध रुग्णांमधील लक्षणांपेक्षा आणि समस्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात.

निदानापूर्वी पाच वर्ष आधी उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल या अभ्यासात काय म्हटलंय समजून घेऊया. ज्या व्यक्तींना अर्ली-ऑनसेट अल्झायमर होतो, त्यांना या आजाराचं अधिकृत निदान होण्यापूर्वी पाच वर्ष आधीपासूनच विविध आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. संशोधकांच्या मते, या वयोगटातील व्यक्तींना नैराश्य, सतत डोकेदुखी, चक्कर येणं आणि अपस्मार म्हणजे फिट्स येणं यांसारख्या समस्यांचा धोका अधिक असतो.

याव्यतिरिक्त, मेंदूला झालेली दुखापत, मेंदूतील रक्तवाहिन्यांचे विकार, थायरॉईडच्या समस्या आणि अतिमद्यपानामुळे उद्भवणाऱ्या समस्या यांसारख्या गोष्टीही त्यांच्यामधे अधिक प्रमाणात दिसून येतात.

विशिष्ट लक्षणं सहा ते दहा वर्षं आधीच दिसू लागतात. ‘अल्झायमर्स अँड डिमेन्शिया: द जर्नल ऑफ द अल्झायमर असोसिएशन’मधे प्रकाशित झालेल्या एका अहवालातून आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. या अहवालानुसार, आजाराचं प्रत्यक्ष निदान होण्यापूर्वी सहा ते दहा वर्ष आधीच रुग्णांमधे काही विशिष्ट लक्षणं दिसून येऊ लागतात. कानात सतत आवाज येणं आणि ऐकण्याच्या क्षमतेत घट होणं ही यातील सर्वात सामान्य लक्षणं आहेत.

हृदयविकाराचा धोका हे मुख्य कारण नाही. वृद्धत्वाशी संबंधित अल्झायमरसाठी हृदय – रक्तवाहिन्यांशी संबंधित धोक्याचे घटक हेच मुख्य कारण मानलं जातं. मात्र, कमी वयात होणाऱ्या अल्झायमरच्या बाबतीत असं दिसून येत नाही.

उशीरा होणाऱ्या अल्झायमरच्या तुलनेत, कमी वयातील रुग्णांमधे उच्च रक्तदाब आणि रक्तातील लिपिड्सची वाढलेली पातळी यांसारख्या समस्या सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळल्या नाहीत असं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.

Popular Articles