spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जागृत ज्येष्ठ नागरिक सभासदांचा मनोमिलन कार्यक्रम थाटात संपन्न

कन्हान :- जागृत ज्येष्ठ नागरिक संस्था कन्हानच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सभासदांचा मनोमिलन कार्यक्रम कृष्णराव लॉन तारसा रोड कन्हान येथे थाटात साजरा करण्यात आला. औचित्य साधुन  जागृत ज्येष्ठ नागरिक संस्था कन्हानच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सभासदांचा मनोमिलन कार्यक्रम संस्थे चे अध्यक्ष बब्रुवान घोडमारे यांच्या अध्यक्षेत आणि प्रमुख अतिथी नगरपरिषद कन्हान-पिपरी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांच्या प्रमुख उपस्थित कृष्णराव लॉन तारसा रोड कन्हान येथे थाटात साजरा करण्यात आला.

मनोमिलन कार्यक्रमाचे औचित्य साधुन संस्थेचे सभासद रमेश हजारे, प्रेम रोडेकर, विठ्ठल मानकर, अशोक घारड, शोभाताई श्रीखंडे यांचा वाढदिवसाचा सोहळा सुध्दा साजरा करून समृध्द आरोग्याच्या शुभे च्या देऊन सर्वानी अल्पोहार करित एकमेकांशी संवाद साधला. संस्थेचे सचिव संजय करंडे हयानी जागृत जेष्ठ नागरिक संस्था कन्हानच्या कार्याविषयी प्रास्ताविकातु न माहीती सांगितली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लता वंजारी यांनी तर आभार नंदकिशोर गजभिये यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता भगवान लांजेवार, रमेश चव्हाण, ताराचंद निंबाळकर, दामोधर बंड, मधुकर कुंभलकर, प्रभाकर रुघे, लता जळते, गौरी कनपटे हयांनी अथक परिश्रम घेतले.

Popular Articles