Related Posts

सराईत गुन्हेगार अमर सराटे एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध; खापा पोलिसांची धडक कारवाई

<p><strong>खापा&comma; वार्ताहर &colon;-<&sol;strong> खापा पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार अमर बंडुजी सराटे &lpar;वय २२&comma; रा&period; आजनी शेरडी&comma; ता&period; सावनेर&comma; जि&period; नागपूर&rpar; याच्याविरुद्ध महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा &lpar;एमपीडीए&rpar; अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे&period; जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचा आदेश जारी केल्यानंतर खापा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ४ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यवर्ती कारागृह&comma; चंद्रपूर येथे स्थानबद्ध केले&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीस अभिलेखानुसार&comma; अमर सराटे याच्याविरुद्ध शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत&period; यामध्ये साथीदारांसह घरफोडी करणे&comma; मोटारसायकल चोरी&comma; गंभीर दुखापत करणे&comma; आगळीक&comma; खोडसाळपणा&comma; अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे&period; त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती&period; मात्र&comma; तरीही त्याच्या गुन्हेगारी हालचाली सुरूच असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे&period; त्याच्या कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून सामाजिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचत असल्याने एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली&period; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले व पुढील कारवाई पूर्ण केली&period; या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी खापा पोलिसांनी कठोर पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे&period;<&sol;p>&NewLine;