Related Posts

हिवाळी वेळापत्रकामध्ये पुणे विमानतळ ‘हाऊसफुल्ल’

<p><strong>&&num;8211&semi; प्रवासी क्षमतेचे प्रमाण ९० ते ९५ टक्के<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>पुणे &colon;-<&sol;strong> पुणे विमानतळावर हिवाळी वेळापत्रकात विमानसेवांना प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे&period; प्रत्येक विमानातील प्रवासी क्षमतेचा वापर ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे&period; नियोजित विमान कंपन्यांकडून बहुतांश स्लॉटचा वापर केला जात आहे&period; त्यामुळे मर्यादित स्लॉट उपलब्ध असतानाही पुणे विमानतळावरील हवाई वाहतुकीची मागणी कायम असल्याचे चित्र आहे&period; त्यामुळे हिवाळी वेळापत्रक हाऊसफुल्ल झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>हिवाळी वेळापत्रक गेल्या आठवड्यापासून लागू करण्यात आले आहे&period; वेळापत्रकात पुणे विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानसेवा सुरू आहेत&period; सध्या पुणे विमानतळावरून देशातील ३५ ठिकाणांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे&period; त्याचबरोबर दुबई&comma; बँकॉक आणि अबू धाबी या आंतरराष्ट्रीय मार्गांवरही थेट उड्डाणे सुरू आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>उन्हाळी वेळापत्रक १ मे २०२६ पासून लागू करण्यात आले होते&period; त्यामध्ये पुणे विमानतळाला १५ अतिरिक्त स्लॉट उपलब्ध झाले होते&period; त्यामुळे विमानतळाची एकूण स्लॉट क्षमता २३५ पर्यंत पोहोचली होती&period; मात्र&comma; पुणे विमानतळाचा वापर नागरी विमान वाहतुकीबरोबरच लष्करी कामकाजासाठीही होत असल्याने विमानांच्या उड्डाणांसाठी स्लॉट उपलब्ध करून देताना मर्यादा येतात&period; परिणामी&comma; नव्या विमानसेवा सुरू करणे आणि सध्याच्या वाढत्या मागणीला सामावून घेणे&comma; हे विमानतळ प्रशासन व विमान कंपन्यांसमोरील आव्हान आहे&period; प्रवासी भरण्याचे उच्च प्रमाण आणि मर्यादित स्लॉट यांचा समतोल राखणे महत्त्वाचे ठरणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>विमानतळावरील स्लॉट म्हणजे ठरावीक वेळेत विमान उतरविण्यासाठी किंवा उड्डाण करण्यासाठी दिलेली परवानगी असते&period; नागरी आणि लष्करी वापर एकाच धावपट्टीवर अवलंबून असल्याने वेळापत्रक आखताना दोन्ही प्रकारच्या हालचालींचा विचार करावा लागतो&period; त्यामुळे प्रवाशांची मागणी असूनही प्रत्येक इच्छित मार्गावर तत्काळ अतिरिक्त फेऱ्या सुरू करणे शक्य होत नाही&period; उपलब्ध क्षमतेचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे&period;<&sol;p>&NewLine;