Related Posts

यवतमाळ तहसीलच्या पुरवठा विभागाला लाचखोरीचे ग्रहण

<p><strong>&&num;8211&semi; निरीक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला लाचखोरीचे ग्रहण लागले आहे&period; तालुका पुरवठा निरीक्षकानंतर आता प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी बुधवारी रात्री एसीबीच्या जाळ्यात अडकला&period; रेशन दुकान परवानाधारकावर सौम्य कारवाई करण्यासाठी मध्यस्थामार्फत ५० हजारांची लाच घेताना निरीक्षण अधिकाऱ्याला मध्यस्थासह ताब्यात घेतले&period; पुरवठा विभागाचा मोठा अधिकारी लाचखोरीत अडकल्याची ही दुसरी वेळ आहे&period; दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नीलेश भास्कर कळसकर &lpar;३८&comma; सह्याद्री अपार्टमेंट&comma; राऊत नगर&comma; यवतमाळ&rpar; असे अटक करण्यात आलेल्या प्रभारी निरीक्षण अधिकाऱ्याचे नाव आहे&period; तर त्याच्यासाठी लाच स्वीकारणारा रेशन दुकान परवानाधारक चंद्रशेखर खुशालराव गायकी &lpar;६०&comma; रा&period; कापरा&comma; ता&period; यवतमाळ&rpar; या खासगी व्यक्तीलाही एसीबीने अटक केली आहे&period; अमरावती एसीबीकडे तक्रारदाराने २६ ऑक्टोबर रोजी त्यांनी लाचेची मागणी होत असल्याची तक्रार केली होती&period; तक्रारदाराच्या स्वस्त धान्य विक्री दुकानाची गावातील एका व्यक्तीने तहसील कार्यालयात तक्रार केली होती&period; या तक्रार अर्जाची चौकशी व दुकानाच्या तपासणी अहवालातील गांभीर्य कमी करून परवाना कायमस्वरूपी रद्द होऊ नये&comma; असा अहवाल पाठविण्याकरिता नीलेश कळसकर यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली&period; याच तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या अमरावती पथकाने सापळा लावला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>नीलेश कळसकर याने चंद्रशेखर गायकी याच्या माध्यमातून लाच घेण्याचे मान्य केले&period; त्यासाठी बसस्थानक चौक परिसरात बोलावण्यात आले&period; तेथे एसीबी पंचासह सापळा लावून होती&period; वर्दळीच्या ठिकाणी गायकी यांनी ५० हजारांची लाच घेतली&period; त्यानंतर पैसे घेण्यासाठी नीलेश कळसकर यांना बोलावले&comma; ते एमएच-४२&sol;एस-२११५ क्रमांकाची कार घेऊन पोहोचले&period; कळसकर यांनी गायकी यांच्याकडून लाचेची रक्कम घेऊन कारमध्ये ठेवली&period; तेव्हा एसीबी पथकाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले&period; त्यानंतर दोन्ही आरोपींच्या घराची एसीबी पथकाने झडती घेतली&period; दोघांवर अवधूतवाडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे&period; ही कारवाई पोलिस अधीक्षक बापू बांगर&comma; अपर अधीक्षक सुनील किनगे&comma; उपअधीक्षक राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुजाता बनसोड&comma; चित्रा मेसरे&comma; जमादार प्रमोद रायपुरे&comma; सुधीर चर्जन&comma; सतीश किटूकले यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;