spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ॲड.अभिजित वंजारी यांचा दिवाळीची पूर्व संध्याकाळ श्रीमंत करणारा देखणा सत्कार सोहळा

नागपूर :- पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेले ॲड.अभिजित वंजारी यांचा सत्कार सोहळा असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज सुपर ॲन्युएटेड टीचर्स च्यावतीने श्री संत संताजी आर्ट गॅलरी, जगनाडे चौक येथे आयोजित करण्यात आला होता. सत्कार सभेच्या अध्यक्षस्थानी  प्राध्यापक डॉ.श्रीनिवास खांदेवाले, तर स्वागताध्यक्ष प्रा. प्रभुजी देशपांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.माहुरे, विनायकराव तुपकर, प्रा.विजया मारोतकर उपस्थित होत्या. प्रा. प्रभुजी देशपांडे यांनी स्वागतपर भाषण दिले. त्यानंतर ॲक्यूसॅट संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरविंद शेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. रामदास माहोरे, प्रा. विजया मारोतकर यांनी देखील ॲड. अभिजीत वंजारी यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला देताना वंजारी म्हणाले की पदवीधर मतदार संघाचे क्षेत्र हे व्यापक होते. निवडणुकीत मोठे आव्हान होते. परंतु आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे मला निवडणूक जिंकता आली. मी सुद्धा रोजगार मेळावे घेऊन अनेक विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या. गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेला लागणारी पुस्तके दिली. त्यामुळे तरुणांसाठी केलेल्या कामाचे, तसेच सामाजिक बांधिलकी राखून प्राध्यापक, शैक्षणिक संस्था, शिक्षक यांच्याही प्रश्नांना विधान परिषदेमध्ये वाचा फोडण्याचे कार्य केले, अशा अनेक केलेल्या कार्यामुळे मला या निवडणुकीमध्ये यश प्राप्त झाले. भविष्यामध्ये ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ची संख्या वाढत जाणार आहे. तेव्हा शिक्षणाचे अनेक प्रश्न निर्माण होतील. असे मनोगत वंजारी यांनी व्यक्त केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी ॲड. अभिजीत वंजारी यांना शाल पुष्पगुच्छ आणि धन्वंतरी देवतेची मूर्ती सप्रेम भेट दिली. ॲक्यूसॅट केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. वाव्हूळ, सचिव डॉ जे.एम.मंत्री व कोषाध्यक्ष प्रा. एस बी नाफडे संभाजीनगर यांनी पाठविलेल्या ठरावाचे सभेमध्ये वाचन करण्यात आले. त्यांनी अभिजीत वंजारी यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन डॉ. पुष्पा तायडे यांनी तर आभार प्राचार्य डाॅ. अडगांवकर यांनी मानले.

Popular Articles