हंसराज,भंडारा संगम पिंपरी :- संगम पिंपरी (जुना गाव) येथे बलिप्रतिपदेनिमित्त कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे लोकराजे महासम्राट बळीराजा यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी “इडा पिडा टळो, बळीचे राज्य येऊ दे… ओबीसींची कॉलमसहित जातीनिहाय जनगणना होऊ दे आणि बहुजनांचे राज्य येऊ दे!” अशा जोरदार घोषणा देऊन शासनाकडे आपली मागणी लावून धरली.
कार्यक्रमात बोलताना वक्त्यांनी सांगितले की, बळीराजा हा जनतेचे कल्याण करणारा, दानशूर आणि शेतकऱ्यांचे रक्षण करणारा प्रजाहितदक्ष राजा होता. मात्र, पुराणात त्यांचे चुकीचे वर्णन करण्यात आले. बळीराजाकडून दानाच्या बहाण्याने सत्ता, संपत्ती आणि शिक्षणाचे हक्क हिरावून घेण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले यांनीही बळीराजाला बहुजनांचा कुलस्वामी मानले होते. त्यामुळे आजच्या काळात शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र ओबीसी जनगणना तातडीने झालीच पाहिजे.
या कार्यक्रमाला ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते, महिला अध्यक्ष शोभा बावनकर, जिल्हा उपाध्यक्ष मनिषा भांडारकर यांच्यासह भाऊ कातोरे, देविदास तीतीरमारे, वीरू तिजरे, गुरुदेव तीतिरमारे, दद्दू तिजारे, जगदीश पडोळे, गणराज चवळे, मंदा ठवकर, पूजा पाटील, सुनिता ठवकर, कोमल दुबे, किरण मते, सत्यशीला तीतीरमारे, स्नेहा मेश्राम, नीता तीतीरमारे, स्वाती व निशा तीतीरमारे तसेच गावातील बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






