spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जीवनविकास एज्युकेशन सोसायटी सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

– सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व नवनविवाहित सभासदांच्या पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

नागपूर :- जीवनविकास एज्युकेशन सोसायटी सेवकांची सहकारी पतसंस्था, सक्करदरा, नागपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेचे संचालक तथा शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र झाडे आणि संचालक नितीन झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी देवेंद्र काळबांडे होते. सभेच्या प्रारंभी संस्थेचे नुकतेच निधन झालेले संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी बाबुराव झाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले. सभेत मागील सभेचा इतिवृत्तांत, आर्थिक पत्रके, वार्षिक प्रगती अहवाल, लाभांश मंजुरी तसेच आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. याप्रसंगी संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रवीण बाबुराव झाडे, अनिता उईके, सतीश माटे, रामचंद्र ठाकरे, नेहा मेहर, शोभा शेरकर आणि तुलसीदास मोहनकर यांचा समावेश होता.

तसेच चालू सहकार वर्षात विवाहबद्ध झालेल्या सभासदांच्या मुला-मुलींचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या भावी वैवाहिक जीवनासाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. याशिवाय सभासदांच्या ज्या पाल्यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले, अशा गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन प्रोत्साहित करण्यात आले. सभेचे संचालन संस्थेचे मानद सचिव बळवंत मोरघडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. देवमन कामडी यांनी मानले. शेवटी प्रमुख अतिथी व सभाध्यक्षांच्या मार्गदर्शनानंतर सभेची सांगता झाली.

Popular Articles