spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मानेवाडा येथील श्रीहरीनगर -2, नागपूर येथे भागवत कथा प्रवचन सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

नागपूर :- भागवत कथा आयोजन समिती, श्रीहरी नगर – 2,नागपूर तर्फे श्री. शिव व संकटमोचन हनुमान मंदिर, श्रीहरीनगर – मानेवाडा नागपूर येथे दिनांक 10 ते 17 नोव्हेंबर या दरम्यान भव्य संगीतमय भागवत कथा प्रवचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भागवताचार्य ह.भ.प. संतोष निंबाळकर महाराज (आळंदीकर) यांनी या दरम्यान दररोज सकाळी काकडा, दुपारी भागवत कथा व सायंकाळी हरिपाठ या दैनंदिन संगीतमय, कृतीयुक्त, व मनोरंजनात्मक कार्यक्रमांद्वारे भगवंतांच्या लीलांचे, संतांचे , थोरपुरुषांचे , शूरविरांच्या कार्याचे दाखले देऊन ” मनुष्याने जीवन कसे जगावे ” या विषयाचे महत्त्व पटवून देऊन भक्तमंडळींना मंत्रमुग्ध केले. महाराजांच्या सोबतीला लक्ष्मण महाराज सकर्डे (झाकी दर्शन ), पौरोहित रामेश्वर महाराज ठाकरे, निळकंठ महाराज गायकी (गायन), हरिपाठाचार्य मारोती महाराज काकडे, काकडाचार्य सुधाकर महाराज हिवरे, ऑर्गनवादक संदीप महाराज बुरंगे, पॅड वादक गिरीश महाराज बुरंगे, तबला- मृदंग वादक अक्षय महाराज चालपे, टाळकरी नाना महाराज ईवनाती यांची संगत लाभली.

दररोज दुपारी सातही दिवस वेगवेगळ्या भागातील भजन मंडळींनी निरनिराळ्या चालीतील भजने गाऊन ‘या पिढीतील तरुणांना भजनातून ‘ समाज प्रबोधनाचे महत्त्व ‘पटवून दिले. 14 नोव्हेंबर रोज शनिवारला श्रीनगर जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने डॉ. हर्षवर्धन कांबळे यांच्या उपस्थितीत ‘मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन ‘करण्यात आले होते, डॉ. राजीव मिश्रा सचिव, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट देऊन सविस्तर मार्गदर्शन केले. या भागाच्या नगरसेविका व नागपूर परिवहन विभागाच्या सभापती मंगला खेकरे यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजन समितीच्या सदस्यांचे व श्रीहरी नगर ज्येष्ठ नागरिक मंडळात उत्साहाने कार्य करणाऱ्या सदस्यांचे भरभरून कौतुक केले व उत्तरोत्तर मंडळाची अशीच प्रगती होत राहील, याबाबतच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. 17 नोव्हेंबर रोजी मंगळवारला सकाळी ” ग्रंथदिंडी ” काढण्यात आली. त्यानंतर लगेच काल्याचे किर्तन करण्यात आले. सायंकाळी नगरातील भक्तमंडळींनी स्वादिष्ट महाप्रसादाचा लाभ घेतला. हा पूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीहरीनगर जेष्ठ नागरिक मंडळाचे पदाधिकारी सुरेशराव ऊरकुडे, विठ्ठलराव घोडे, शिवराम गुरनूले, डॉ.अशोक मंदे, प्रवीण सुरकर, अशोक माहूरे, जयरामसिंग ठाकूर, डॉ.सोहन चावरे, छोटू जगनाडे, गणेश भारद्वाज, केशवराव बोपूलकर, नंदकिशोर शिंगनजूडे, रामदास कोल्हे, जानराव बारई घनश्याम ढोले, विजयजी लोणारे, मोरेश्वर ढोबळे, सुशील दहेकर, रवींद्र नखाते, हरीश लाकडे, रामकृष्णा कोल्हे, आनंद सेलूकर, नामदेवराव खाटके, कवडू ईटणकर, डॉ. प्रदीप काळे, स्वप्नील उरकुडे, राजेंद्र सुळके, प्रतीक लांजेवार, मनीष सुळके, ईश्वर पिसाळ, मंगला ऊरकुडे, आशा माहुरे, पुष्पा सुरकर, मीनाक्षी मंदे,लांजेवार,अपर्णा सुळके, वैशाली ऊरकुडे, लाकडे, अश्विनी उरकुडे व सर्व भक्तमंडळीचे मोलाचे सहकार्य लाभले.

Popular Articles