किशोर साहू,मौदा :- खात – रेवराल जि प क्षेत्रातील गट ग्रा पं घोटमुंढरी अंतर्गत येणाऱ्या शिवनी येथे आदिवासी समाजाचे महानायक, क्रांतिकारक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष, समाजाच्या स्वाभिमानासाठी दिलेला लढा, तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या रक्षणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याबद्दल मार्गदर्शन केले.भगवान बिरसा मुंडा यांचे जीवन म्हणजे अन्यायाविरुद्ध संघर्ष, स्वाभिमान, त्याग आणि समाजजागृतीचा प्रेरणादायी इतिहास आहे. त्यांचे विचार आणि कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील.
याप्रसंगी माजी भाजपा मौदा तालुकाध्यक्ष तथा माजी पं स सदस्य मौदा मुकेश अग्रवाल,माजी जि प सदस्या राधा मुकेश अग्रवाल, सरपंच अदासा संजय आतीलकर,माजी उपसरपंच, घोटमुंढरी गोरखनाथ मडावी, पोलीस पाटील शालिनी गजभिये,माजी ग्रा पं सदस्य मिलिंद गजभिये, प्रतिष्ठित नागरिक अशोक दळणे, देवा मडावी, देवराव दळणे,राजू नेताम सह आदिवासी समाज बांधव-भगिनी, बालगोपाल आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






