spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध रेती वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल

– ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलीस स्टेशन भिवापूर दिनांक २०/११/२०२६ रोजी भिवापूर पोलीस अवैध धंदयांवर कारवाई कामी पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, टिप्परने अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी टिप्पर शोध कामी सर्तक पेट्रोलींग केली असता मौजा तास शिवार भिवापूर ते उमरेड रोड येथे एक टिप्पर संशयीतरित्या जाताना दिसुन आले. सदर वाहनाचे चालकाला थांबण्याचा इशारा केला. पोलीसांनी सदर वाहनाची तपासणी केली रेती आढळुन आली. आरोपींना रेती वाहतुक परवान्याबाबत विचारणा केली त्यांच्या कडे परवाना नसल्याची माहीती प्राप्त झाली. टिप्पर मालक नामे १) अभिनव संजय डडमल, वय २४ वर्ष, रा. मोहगाव, हिंगणा, ता. हिंगणा, जि. नागपूर याच्या सांगणेवरून चालक क्र. २) हर्ष उर्फ हिमांशु ठाकरे, वय २३ वर्ष, रा. बहादुरा, नागपूर याने सांवगी घाट, गडचिरोली येथुन अवैधरित्या उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतुक केल्याची माहीती समजली.

पोलीसांनी पंचासमक्ष टिप्पर क्र. एम एच-४०/ डी सी-९४४४ आणि ८ ब्रास रेती असा एकुण किंमती ३०,४०,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. नमुद आरोपी यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ४९, ३(५) भान्यासं सह कलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम चे कलम ४८ (७) (८), सह कलम ३, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम, सहकलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम, सहकलम मोटर वाहन कलम १३४,१७७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles