spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

 नागभीड-चंद्रपूर राज्य महामार्गावर भीषण अपघात

– दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

चंद्रपूर :- नागभीड-चंद्रपूर राज्य महामार्गावरील चिंधी माल फाट्याजवळ शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारचाकी वाहनाचे तीन टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. भरधाव वाहन उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.

 परतीच्या प्रवासात काळाने घातला घाला

हे सर्व प्रवासी दारू सोडण्यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील रामपुरी येथे गेले होते आणि परतीच्या प्रवासात त्यांच्यावर काळाने घाला घातला. सुदर्शन गजानन नैताम (५०, रा. वरोरा) आणि विनोद धोटे (५०, रा. वरोरा) अशी मृतांची नावे आहेत. विनोद राऊत (४६), प्रवीण महादेव येरमे (४०) आणि निलेश दादाजी मडावी (४९) हे गंभीर जखमी झाले असून, पिंटू दादाजी मडावी, आदित्य सुदर्शन नैताम आणि अजय या जखमींना नागपूरला हलविले आहे.

गंभीर जखमींना उपचारासाठी नागपूर येथे हलविले

माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पोलिस व रुग्णवाहिकेला पाचारण केले. सर्व मृतदेह व जखमींना नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथून विनोद राऊत, प्रवीण येरमे आणि निलेश मडावी या गंभीर जखमींना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे वरोरा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. नैताम है किरकोळ जखमी झाले आहेत. मृत व जखमी सर्वजण वरोरा तालुक्यातील रहिवासी आहेत. हे सर्वजण रामपुरीतून एमएच-२४/ एडब्लू-२९१० क्रमांकाच्या वाहनाने नागभीडकडे येत होते. चिंधी माल फाट्याजवळ हा अपघात झाला.

Popular Articles