spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे महिलांसाठी संगणक प्रशिक्षण वर्ग

– महिला व बाल कल्याण समितीचा निर्णय

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे महिलांना संगणक प्रशिक्षण, ई-रिक्षाचे वाटप व हाऊसकिपिंगचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय महिला व बाल कल्याण विशेष समितीने घेतला.

मनपाच्या महिला व बाल कल्याण विशेष समितीची बैठक सभापती सारिका नांदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 23) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडली. यावेळी समितीच्या उपसभापती तारा (लक्ष्मी) यादव, महेश्वरी बिसेन, चेतना निमजे, लक्ष्मी हत्तीठेले, शीला तराळे, कल्पना द्रोणकर,  तसनीम परवीन नियामत खान ताजी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम, समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे उपस्थित होते.

मनपाच्या समाज विकास विभागातर्फे महिला व मुलींसाठी विविध योजना राबविल्या जात असल्याची माहिती उपायुक्त डॉ. लाडे यांनी यावेळी दिली. यावेळी शालेय मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप, शहरात पाच रात्रीचे निवारे आहेत. यात 250 लाभार्थी आहे. याशिवाय शहरात 2 भिक्षेकरी गृह असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महिला व मुलींसाठी मनपाच्या 14 वेगवेगळ्या योजना असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महिलांमध्ये संगणक साक्षरता वाढविण्यासाठी महिलांना संगणकाचे प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी राज्य सरकारच्या मान्यता प्राप्त असलेल्या संस्थांकडे हे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली. त्याचप्रमाणे महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढविण्यासाठी ई-रिक्षा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याशिवाय हॉटेल मॅनेजमेंट, हाऊस किपींग, वाहन प्रशिक्षणाचे वर्ग आयोजित करावे, अशी सूचना सभापती श्रीमती सारिका नांदूरकर यांनी यावेळी केली.

मनपातर्फे संचालित अनुसयाबाई काळे समुपदेशन केंद्रासाठी प्रत्येक झोनमध्ये स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना यावेळी अनेक सदस्यांनी केली. यासंदर्भात प्रशासनाने योग्य कारवाई करावी, असे निर्देश श्रीमती सारिका नांदूरकर यांनी दिले. याशिवाय प्रत्येक झोनमध्ये महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजित करावे, सर्व योजनांची अंमलबजावणी तात्काळ करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

Popular Articles