spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दमदार पाऊस कधी पडणार? शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ढग दाटून येतात, पण पाऊस गायब.

 

सचिन चौरसिया, प्रतिनिधी


रामटेक 1 :-
मृग नक्षत्राच्या आगमणानंतर २३ दिवसाचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही दमदार पावसाला सुरवात झाली नाही. मान्सूनचा दमदार पाऊस केव्हा येणार याकडे बळीराजासह सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागले असून, वरून राजाच्या वक्रदृष्टीने बळीराजा घायाळ होत आहे. पाऊस येईल या आशेवर कपाशी, तूर व ईतर पिकांची पेरणी केली. काही कपाशी आणि तुरीला कोंब आले. शेतकऱ्यांना हुलकावणी देत अचानक पाऊस गायब झाला. आणि शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळण्याच्या मार्गावर  आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा आभाळाकडे लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उमेदीने खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. अधूनमधून दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी आल्या. कपाशी व तूर उगवण होण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. मात्र, मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासून देवलापार परीसरात दमदार पावसाचे आगमन झाले नाही. आता तर आकाशात काळे ढग दाटतात; पण पाऊस येत नाही.परीसरातील पथरई, दाहोदा,घोटी, पिपरिया, बंजार, हिवरा या भागात सुद्धा पाहिजे तसा पाउस नसल्याने जमिनीत ओलावा नाही. यावर्षी दमदार पाऊस न झाल्यास जमिनीत खोलवर ओलावाच पोहचला नाही. त्यामुळेसुद्धा कपाशी किंवा तुरीला अंकूर निघाले नाही. त्यामुळे पीक वर आलेच नाही. येत्या दोन तीन दिवसात दमदार पावसांच आगमण होणे गरजेचे आहे अन्यथा दुबार पेरणीचे संकट येवू शकते. जमीनित ओलावाच नाही तर पीक उगवणार कशी हा प्रश्न निर्माण होत आहे.

शेतकरी झाले चिंतातूर
धान उत्पादक शेतकरी सद्यातरी तितकाचा चिंतेत नसला तरी.अनेकांचे पऱ्हे टाकून व्हायचे आहे. पऱ्हे रोवणा कर्ता लागवडीकरिता येेण्याकरीता २० ते २५ दिवसांचा कालावधी लागतो. तोवर पाउस येईलच या आशेवर असून अनेक शेतकऱ्यांना पऱ्हे टाकले आहे. हलक्या पुलक्या सरींना ते टीकू शकत असले तरी येत्या आठ ते १५ दिवसात धानाकरीता जोरदार पावसाची गरज आहे. परंतू सद्यस्थितीत पऱ्हे सुकु लागले आहे

दुबार पेरणीचा धोका?
खरीप हंगामासाठी मृग नक्षत्रात कपाशी व तुरीची पिकांची शेतात आठ दिवसांआधी लागवड केली. मात्र, त्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत बसला आहे. उगवण्याची शक्यता कमी द्सते. असतानाच अचानक पाऊस गायब झाल्याने पावसाअभावी कपाशी आणि तुर पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुबार पेरणीचो संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे

Popular Articles