spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जि.प.शाळा तोंडलीत खुलली सुंदर परसबाग

किशोर साहू, मौदा, ता.५:- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तोंडली विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच विविध उपक्रम राबवत असते. त्यातीलच एक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेमध्ये परसबाग उपक्रमात प्रभावी छाप पाडत तोंडली शाळेतील शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी सुंदर परसबाग फुलवली आहे.

शाळेतील परसबागेत लौकी, दोडके, मिरची, टोमॅटो, काकडी , कांदा, लसूण बटाटे यांची झाडे आहेत. त्यांचा उपयोग रोजच्या शालेय पोषण आहार शिजवताना होतो या व्यतिरिक्त परसबागेमध्ये विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पती असणारे अद्रक(आले), हळद, कढीपत्ता, निवडुंग, पानफुटी,तुळस अशा विविध वनस्पतीची लागवड केली आहे. त्या वनस्पतीची ओळख, औषधी उपयोग, लागवडीचा कालावधी यासंबंधी सखोल माहिती विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून मिळवून त्याची प्रकल्प वहीत नोंद केली आहे. शाळेतील परसबाग उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांकडून कौतुक होत आहे.

Popular Articles