spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

३४ वर्षांची कर्तव्यनिष्ठा सेवेचा समर्पणाचा गौरव सोहळा !

◼️नंदू मलघाटे यांच्या सेवापूर्ती कार्याच्या कृतज्ञपर्वक निरोप 

सचिन चौरसिया, रामटेक :- तालुक्यातील ज्ञानदीप विद्यामंदिर कारवाही येथील कर्मचारी सेवानिवृत्ती निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. ३४ वर्षांपासून कार्यरत असलेले नंदू मलघाटे यांना निरोप देण्यात आला. शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी नंदू मलघाटे यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रिय स्वभाव आणि संस्थेप्रती असलेल्या समर्पित सेवेचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नंदू मलघाटे व त्यांच्या पत्नी मनीषा मलघाटे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष शैलेंद्र किंमतकर तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मनोहर वंजारी, सरपंच रंजीत कोकडे, उपसरपंच अनुराधा गडेर, नीता वंजारी, प्रमिला साईलवार, विपुल कोकडे, मुख्याध्यापक केशव गोरडे आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक संजय लोणारे व कैलास निघोट यांनीही मनोगत व्यक्त करून मलघाटे यांच्या सेवाकार्याचा गौरव केला. अमित तडस यांनी सूत्रसंचालन तर लुकेश चरडे यांनी आभार मानले. सनम राठोड, सुभाष गायकवाड, भोले साईलवार, रमला सिरसाम, श्वेता ईनवाते व महेंद्र उईके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला माजी ग्रामपंचायत सदस्या पुष्पा निघोट, मंगला गोरडे, रविना राठोड, जयंती मलघाटे, दीक्षा मलघाटे, कुणाल मलघाटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles