spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खिडकी येथे महिला शेतीशाळेचा दुसरा वर्ग उत्साहात

सचिन चौरसिया, रामटेक :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत खिडकी येथे महिला शेतीशाळेचा वर्ग क्र. २ उत्साहात पार पडला. या वर्गामध्ये महिला शेतकऱ्यांना श्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवून आधुनिक व शास्त्रशुद्ध लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लागवडीपूर्वी भाताची रोपे क्लोरपायरीफॉस द्रावणामध्ये बुडवून त्यानंतर लागवड करण्यात आली. या प्रक्रियेमुळे सुरुवातीच्या अवस्थेत खोडकिडीसारख्या किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते तसेच पिकाचे संरक्षण होऊन चांगल्या वाढीस चालना मिळते, अशी माहिती उपस्थित महिला शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळी श्री पद्धत व पट्टा पद्धतीतील फरक, त्यांचे फायदे, तसेच योग्य अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिला शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या वर्गास मंडळ कृषी अधिकारी रवी राठोड, सहाय्यक कृषी अधिकारी शाश्वती डोफे तसेच समूह सहाय्यक धनश्री निघोट उपस्थित होते.

Popular Articles