किशोर साहू, मौदा :- चाचेर येथे रामटेक- चाचेर -मौदा राष्ट्रीय महामार्ग क्र.339 या महामार्गावर अभी इंटरप्राईजेस कंपनीचे रस्ता सिमेंटकरण बांधकामाचे काम सुरू आहे. चाचेर हे गाव जवळपास 7000 लोकसंख्येचे असून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागून वसलेले आहे.वाहतुकीच्या मुख्य रस्ता असल्यामुळे अपघात नाकारता येत नाही. करिता शेतकऱ्यांच्या, शाळेतील मुलांच्या व गावातील नागरिकांच्या दळणवळणचा रस्ता असल्यामुळे चाचेर गावाकरिता छोटा मायनर ते देऊ इन बार पर्यंत दोन्ही बाजूंनी सेवा रस्ता (सर्विस रोड ) शाळकरी, शेतकरी व गावकरी यांचा सुरक्षितेसाठी.मदन बरबटे यांच्या कॉम्प्लेक्स जवळ पूल बांधकाम,एरिगेशन कॉलनी कडून येणारा शेतीचे पाणी गावातील नालीला बांधिस्त होण्यासाठी.हनुमान मूर्ती बस- स्टॉप जवळ व निसतखेडा रोड या दोन्ही ठिकाणी ब्रेकर ची व्यवस्था. अपघातप्रवण क्षेत्रकारिता मुख्य रहदारीच्या रस्ता असल्यामुळे बस -स्टॉप हनुमान मूर्ती जवळ हायमस्ट लाईट (बारा मीटर )महिलांचा सुरक्षेतकारिता ,इत्यादी कामे सुरू असलेल्या कामात सुधारणा करून तात्काळ करून देण्याची मागणी करणारे निवेदन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या जिल्हा नियोजन कार्यालयातील रविवार (ता.19 एप्रिल) ला घेण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमात चाचेर ग्रामपंचायतच्या सरपंचा लुम्बिनी महेश कलारे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
याप्रसंगी माजी जि प सदस्य कैलास बरबटे, भाजपा किसान आघाडी रामटेक ग्रामीण जिल्हा मंत्री विनोद कोपरकर, वरप्रसाद वाक्कलपूडी , सुरेश खंडाईत, राजु धोटे,प्रभाकर दरवई,वासुदेव सोमकुवर, श्रीराम जांभरे, सुरेंद्र टेम्भरे, श्याम किरपान,ओमकार महादुले, नीलकंठ बावनकुळे, डॉ. बाबा शेख,चंदु देऊळकर,मोरेश्वर किरपान, बंडु बावणे, सौरभ गायधने, व्यंकटेश जुजाराप्पू, राधेश्याम दरवई,मल्लू गडे,नरहरी कोपरकर,किशोर ढोमणे, विलास दरवई, प्रकाश गुंडम, भुऱ्या शेंडे, महेश महादुले, महेश सोनवणे,गज्जू दोडके, तुळशीराम चौरे उपस्थित होते.

