spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

23,655 खातेदारांचे आधार उपलब्ध; पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध होणार

हंसराज,भंडारा :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यांची नोंदणी प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भंडारा तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत पीक कर्ज घेतलेल्या 23,658 कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

जिल्हा उपनिबंधक शुद्धधन कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपलोड करण्यात आलेल्या 23,658 खात्यांपैकी 23,655 खातेदारांचे आधार क्रमांक उपलब्ध असून केवळ तीन मयत खातेदारांच्या आधाराची नोंद प्रलंबित आहे. संबंधित वारसांनी किंवा प्रतिनिधींनी आवश्यक कागदपत्रांसह आधाराची माहिती तातडीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेच्या शासन निर्णयानुसार अपात्र लाभार्थ्यांची छाननीही करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, अर्बन बँका, कृषी उत्पन्न बाजार समित्या (एपीएमसी), दूध संघांचे पदाधिकारी व अधिकारी, तसेच लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद सदस्यांचा आवश्यक डेटा शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून त्यावरील पुढील कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे.

लवकरच पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, ती संबंधित गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रदर्शित केली जाईल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.