दिनांक १०/०१/२०२६ चे एका वृत्तपत्रात की, नगरधन किल्ल्याभोवतीचे अतिक्रमण काढा अशा शिर्षकाखाली बातमी प्रसीध्दी झाली आहे. सदर प्रकरणाची सविस्तर माहीती अशी आहे की, भारतीय पुरातत्व विभाग, नागपुर यांच्या प्राप्त आदेशानुसार तहसिलदार, रामटेक यांनी नगरधन किल्ला परीसारात कोणतेही बांधकाम प्रशासनाच्या परवानगिशिवाय करू नये तसेच ३०० मिटर परीसारात अतिक्रमण करू नये अशा आशयाचे फलक लावण्याचे आदेश तसेच असलेले अतिक्रमण काढयाबाबत आदेश ग्रामपंचायत नगरधन यांना दिले. तहसिलदार यांच्या आदेशाने नगरधन ग्रामपंचायत यांनी ठराव पास करून नगरधन किल्ल्याच्या ३०० मिटर परीसरात कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण न करण्याबाबताचा जाहीर सुचनेचा फलक किल्ल्याच्या दर्शनी भागात लावलेला आहे.








