spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या देशी, मोहफुलांची दारू बाळगणाऱ्या, विक्री करणाऱ्या आरोपीतांवर कारवाई

– एकूण १२ आरोपीविरूध्द ९ गुन्हे नोंद. एकूण ७५,५६०/- रू. चा मुद्देमाल जप्त

नागपुर :- पोलीस स्टेशन काटोल दिनांक ०७/०२/ २०२६ रोजी पोलीस स्टेशन काटोल येथे महाराष्ट्र दारू बंदि अधिनियमान्वये एकूण गुन्हे दखल करण्यात आले. मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीसांनी पो.स्टे. काटोल हद्दीतील १) मौजा डोंगरगाव व पारधी बेडा येथे अवैधरित्या मोहफुलांची हातभट्टीची गावठी दारू विक्रीकरीता काढणाऱ्या एकूण सहा महिला आरोपी यांचे वर पंचांसह छापा टाकून त्यांचे जवळून तसेच घटनास्थळावरून ६०० लीटर मोहफुलांचा सडवा प्रति लीटर ३५/- रू. प्रमाणे एकूण किं. ४२,०००/- रू. २५ लिटर मोहफुलांची हातभट्टीची गावठी दारू प्रति लिटर किं. १००/- रू. प्रमाणे एकूण किं. २५००/- रू., २१ लोखंडि व प्लास्टीक चे ड्रम प्रति ड्रम १०००/- रू. प्रमाणे एकूण कि. २१,०००/-रू, २ प्लास्टीक च्या नळ्या, २ लोखंडि झाकन आणि इतर साहित्य किं. ४,०००/- असा एकूण किंमती ६९,५००/- रू. चा मुद्देमाल मिळून आल्याने दारू व इतर मुद्देमाल जप्त करून तसेच नाशवंत मोहफुलांचा सडवा जागीच नष्ट करून एकूण ६ महिला आरोपीतांविरूध्द कलम ६५ (ई), ६५ (फ), ६५ (क) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच २) मौजा तारबाजार काटोल येथे अवैधरित्या देशी दारू जवळ बाळगुन विकी करणारा आरोपी नामे धनराज महादेव वाघ रा. वाघोडा ता. काटोल जि. नागपुर याचे वर पंचांसह छापा टाकून त्याचे जवळून ९० एम.एल. क्षमतेच्या १० बॉटल देशी दारू प्रिमीयर प्रति बॉटल किं. ४०/- रू. प्रमाणे एकूण किं. ४००/- रू. ची दारू जप्त करून आरोपीविरूध्द कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.

(अशा प्रकारे पो.स्टे. कोटोल येथे दारूबंदि च्या एकूण ४ गुन्ह्यांमध्ये ६९,९००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून ७ आरोपीतांविरूध्द गुन्हे नोंद करण्यात आले आहे.)

पोलीस स्टेशन केळवदः दिनांक ०७/०२/२०२६ रोजी पोलीस स्टेशन केळवद येथे मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीसांनी पो.स्टे. केळवद हद्दीतील मौजा छत्रापुर फाटा येथे अवैधरित्या देशी दारू जवळ बाळगुन विकी करणारा आरोपी नामे सोमेश्वर रामदास वडस्कर वय ४२ वर्ष रा. नांदागोमुख ता. सावनेर याचे वर पंचांसह छापा टाकून त्याचे जवळून १८० एम.एल. क्षमतेच्या ४ बॉटल देशी दारू संत्रा नं. १ प्रति बॉटल किं. ८०/- रू. प्रमाणे एकूण किं. ३२०/- रू. ची दारू जप्त करून आरोपीविरूध्द कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.

पोलीस स्टेशन उमरेड: दिनांक ०७/०२/२०२६ रोजी पोलीस स्टेशन उमरेड येथे

मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीसांनी पो.स्टे. उमरेड हद्दीतील मौजा उमरेड बस स्टाफ समोरील उडान पुलीया खाली येथे अवैधरित्या देशी दारू जवळ बाळगुन विक्री करणारा आरोपी नामे प्रफुल खुशरंग राजपुत रा. वेलसाखरा ता. उमरेड याचे वर पंचांसह छापा टाकून त्याचे जवळून १८० एम.एल. क्षमतेच्या ८ बॉटल देशी दारू संत्रा नं. १ प्रति बॉटल किं. ८०/- रू. प्रमाणे एकूण किं. ६४०/- रू. ची दारू जप्त करून आरोपीविरूध्द कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.

पोलीस स्टेशन कन्हानः दिनांक ०७/०२/२०२६ रोजी पोलीस स्टेशन कन्हान येथे

मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीसांनी पो.स्टे. कन्हान हद्दीतील मौजा गोडेगाव येथे अवैधरित्या देशी दारू जवळ बाळगुन विकी करणारा आरोपी नामे चंद्रकांत गुलाबराव कुंभलकर वय ४४ वर्ष रा. गोडेगाव कन्हान ता. पारशिवनी याचे वर पंचांसह छापा टाकून त्याचे जवळून ९० एम.एल. क्षमतेच्या ५० बॉटल देशी दारू संत्रा नं. १ प्रति बॉटल किं. ४०/- रू. प्रमाणे एकूण किं. २०००/- रू. ची दारू जप्त करून आरोपीविरूध्द कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.

पोलीस स्टेशन खापा दिनांक ०७/०२/२०२६ रोजी पोलीस स्टेशन खापा येथे

मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीसांनी पो.स्टे. खापा हद्दीतील मौजा उमरी येथे अवैधरित्या मोहफुलांची हातभट्टीची गावठी दारू जवळ बाळगुन विकी करणारा आरोपी नामे योगेश मनोहर ठवरे वय ३६ वर्ष रा. खूबाळा याचे वर पंचांसह छापा टाकून त्याचे जवळून ७ लिटर मोहफुलांची हातभट्टीची गावठी दारू प्रति लिटर किं, १००/- रू. प्रमाणे एकूण किं. ७००/- रू. ची दारू जप्त करून आरोपीविरूध्द कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.

पोलीस स्टेशन नरखेड दिनांक ०६/०२/२०२६ रोजी पोलीस स्टेशन नरखेड येथे

मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीसांनी पो.स्टे. नरखेड हद्दीतील मौजा पिठोरी शेत शिवार येथे अवैधरित्या मोहफुलांची हातभट्टीची गावठी दारू जवळ बाळगुन विकी करणारा आरोपी नामे भिमराव रामराव उईके वय ३८ वर्ष रा. पिठोरी ता. नरखेड याचे वर पंचांसह छापा टाकून त्याचे जवळून २० लिटर मोहफुलांची हातभट्टीची गावठी दारू प्रति लिटर किं. १००/- रू. प्रमाणे एकूण किं. २०००/- रू. ची दारू जप्त करून आरोपीविरूध्द कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.

(अशाप्रकारे संपूर्ण नागपूर ग्रामीण घटकात दारूबंदि च्या गुन्ह्यात एकूण १२ आरोपीविरूध्द ९ गुन्हे नोंद व एकूण ७५,५६०/- रू. चा मुद्देमाल जप्त)

Popular Articles