spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अप्पर जिल्हाधिकारी जाधव यांची पवनी तालुक्यातील धानशेतीची पाहणी

हंसराज,भंडारा :- पावसातील प्रदीर्घ खंडामुळे भात पिकावर निर्माण झालेल्या ताण व तसेच काही भागात तुडतुडा व खोडकिडीचा झालेला प्रादुर्भाव त्याच्या पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी आज शेताच्या बांधावर जाऊन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. पवनी मंडळातील मौजा बाम्हणी, लोणारा व मौजा कोरंभी, ठाणा परिसरातील शेतांना भेट देऊन त्यांनी शेतकऱ्याशी थेट संवाद साधून पिकाची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता तसेच किडीच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या.

मौजा बाम्हणी येथील गट क्र. 79 शेतकरी जानकी साधू मेंगरे यांच्या शेतात जाऊन त्यांनी प्रत्यक्ष सहाय्यक स्तरावरून ई पिक पाहणी केली. त्यानंतर ठाणा येथील गट क्र. 57 सरकारी पट्टेदार शेतकरी यांच्या शेतालाही भेट देऊन भात पिकाची सहाय्यक स्तरावरून ई पिक पाहणी केली. त्यावेळी भात पिकावर झालेला तुडतुडा, खोडकिडीचा प्रादुर्भाव तसेच पावसातील खंडामुळे पिकाच्या वाढीवर झालेला परिणाम याबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

शेतकऱ्यांनीही अप्पर जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधताना पिकाची सद्यस्थिती, कीड नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्याबाबतच्या अडचणी मांडल्या. अप्पर जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीचे पाहणी करून पिकाच्या नुकसानीचे अचूक सर्वेक्षण करावे. आवश्यकतेनुसार नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार पवनी, नायब तहसीलदार महसूल यांना दिले.

दुष्काळ सदृश परिस्थिती आणि पिकावरील किडीच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक ती मदत मिळण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल असेही अपर जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्याशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या नुकसानीचे अचूक सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे निर्देश दिले. त्यावेळी तहसीलदार पवनी सतीश साळवे, नायब तहसीलदार महसूल किशोर राऊत, ग्राम महसूल अधिकारी सहदेव, काळसर्फे व संबंधित शेतकरी उपस्थित होते.

Popular Articles