spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मानेवाड्यात अखिल भारतीय हास्य कवी संमेलन यशस्वी

नागपूर, प्रतिनिधी :- मानेवाडा येथील बालाजीनगरमध्ये श्री शीतला माता मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित अखिल भारतीय हास्य कवी संमेलनात देशभरातून आलेल्या कवींनी हास्य, व्यंग्य, शृंगार आणि ओजपूर्ण रचनांद्वारे श्रोत्यांना रात्री उशिरापर्यंत मंत्रमुग्ध केले. संमेलनाचे संयोजन राष्ट्रीय कवयित्री मंजुश्री ‘पुष्प’ कारेमोरे (नागपूर) यांनी केले, तर तुमसर येथील हास्यकवी प्रमोद शाहू पारखी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सुरुवात मंजुश्री यांच्या शारदा वंदनेने झाली. दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी कवींचे स्वागत करून ‘हसणे हेच जीवन आहे’ असा संदेश दिला.

ज्येष्ठ संपादक व राष्ट्रीय कवी सुदर्शन चक्रधर (नागपूर) यांनी हास्य-व्यंग्यात्मक रचनांनी, देवास येथील चित्रपटगीतकार मनोज दुबे यांनी भावपूर्ण गीतांनी, तर मंजुश्री ‘पुष्प’ कारेमोरे यांनी सामाजिक व शृंगाररसातील रचनांनी रंगत आणली. सतना येथील आजाद वतन वर्मा यांनी देशभक्तिपर रचनांतून श्रोत्यांमध्ये जोश निर्माण केला, तर जौनपूर येथील आचार्य सफर जौनपुरी यांनी भरपूर वाहवा मिळवली. ललितपूर येथील ओजस्वी कवी पंकज अंगार (टीव्ही फेम) आणि नागपूरचे गझलकार शादाब अंजुम यांनीही प्रभावी सादरीकरण केले. सूत्रसंचालक प्रमोद शाहू पारखी यांच्या हास्यरचनांनी श्रोत्यांना मनमुराद हसवले.

विशेष प्रयत्न करणारे

या कवी संमेलनाच्या यशस्वितेसाठी श्री शीतला माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र बानाईत, उपाध्यक्ष दिलीप भोयर व पंकज जैस्वाल, सचिव रमेश राऊत, सहसचिव बाबू भैया ठाकूर, कोषाध्यक्ष सुरेश आदमने, सहकोषाध्यक्ष शत्रुघ्न सिंह चंदेल यांच्यासह अॅड. राजू भाऊ, संजय डूमरे, विनीत गणोरकर आणि भरत भाऊ आदींनी अथक प्रयत्न केले.

Popular Articles