नागपूर :- आकाशवाणी नागपुरचे कृषी आणि गृह विभागाचे कार्यक्रम आता newsOnair ऍप च्या माध्यमातून सम्पूर्ण जगभर ऐकल्या जातात . तांत्रिक दृष्टया सुधारणामुळे उच्च दर्जाचे कार्यक्रम आता ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात ऐकल्या जात असल्याचे प्रतिपादन आकाशवाणी नागपुर केंद्राचे उप महानिदेशक (अभियांत्रिकी) श्रीमती मनीषा शेटे यांनी केले. शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून आकाशवाणी वरून करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
सोमवार १६ मार्च २०२६ रोजी आकाशवाणी नागपुरच्या कृषी आणि गृह बिभाग तर्फे ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीची त्रैमासिक सत्र अप्रैल ,मे ,जून २०२६ ची बैठक आकाशवाणी नागपुर केंद्राच्या सभागृहात संपन्न झाली . आकाशवाणी कृषि बिभागाचे कार्यक्रम अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा दृष्टिने निरंतर प्रयत्न करीत असल्याचे डॉ विजय सिंग राजपूत , कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी नागपुर यांनी सांगीतले.
बैठकीच्या सुरुवातीला सध्या सुरु असलेल्या तिमाहातील महत्वाच्या कार्यक्रमाचा आढावा तसेच अप्रैल,मे,जून 2026 या त्रैमासिकात प्रसारित होणारे कृषि आणि गृह बिभागाच्या कार्यक्रमाचे पूर्वावलोकन कृषि कार्यक्रम अधिकारी सचिन लाडोले यांनी केले. या तिमाहातील प्रसारित होणारे कार्यक्रमाचे वाचन शांतनु ठेंगडी आणि निहास लोखंडे नैमेत्तिक उदघोषक यांनी केले. या बैठकीला विनोद रापतवार जिल्हा महिती अधिकारी नागपुर, अश्विनी नीलकंठ टेकाम मत्स्य व्यवसाय अधिकारी नागपुर रवींद्र मनोहरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपुर डॉ. जावेद खान पठान मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपुर, डॉ. हर्षा मेंढे प्राध्यापक कृ.म.वि. नागपूर, कृषि विस्तार विभाग नागपुर, उषा आर .डोंगरवार, वरिष्ठ वैज्ञानिक एवं प्रमुख के.व्ही. के.सकोली ,डॉ. वैशाली बांठिया , पशु विद्यालय नागपुर , डॉ. अमित डोंगरे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा ) नागपुर , राजेश एम् मेश्राम प्रसिद्धी शाखा वन विभाग वन भवन नागपुर,डॉ विनोद खडसे विस्तार कृषी विद्यावेत्ता पी. डी. के. व्ही. कृषी महाविद्यालय नागपुर उपस्थिति होते. अशा प्रकारे नागपुर केंद्राच्या कृषि आणि गृह बिभागाची बैठक यशस्वीपणे संपन्न झाली








