– भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
मुंबई :- माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे व धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंत, कन्या सखी सावंत, संजय सावंत, सोहम सावंत, अजिंक्य सावंत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आ. राणा जगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अनिल काळे, संताजी चालुक्य, मल्हार पाटील, भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात अग्रेसर बनवण्यासाठी होत असलेल्या कामाने प्रभावित होऊन या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या भूमिकेनुसार देशाला परम वैभवाकडे नेण्याचे काम वेगाने सुरू असल्याचेही ते म्हणाले. समाजातील सर्व घटकांना न्याय आणि त्यांचा विकास करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत असेही त्यांनी नमूद केले. या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात भाजपाला अधिक बळकटी मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

भाजपाची ताकद वाढवण्यासाठी ही सर्व मंडळी काम करतील अशी आशा आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये उबाठाचे जिल्हा प्रमुख गौतम लटके, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी बांधकाम सभापती दत्तात्रेय मोहिते, तालुका संघटक परंडा-जयदेव गोफणे, भूमचे युवा सेना तालुका प्रमुख निलेश चव्हाण, जवळा विभाग प्रमुख विजय नवले, कंदळगाव चे सरपंच मगनदास पवार, आसू चे माजी सरपंच शशिकांत खुने,नालगांव उपसरपंच अमोल करळे, उद्योजक सुधीर खंडेकर, पांडुरंग काळदाते, अविनाश हांगे आदींचा समावेश आहे.




