spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सैय्यद लष्कर शाहा शहीद बाबांचा उर्स उत्साहात साजरा, देशात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष दुवा

खापा, वार्ताहर :- तालुक्यातील महारकुंड येथील प्रसिध्द दर्गा हजरत बाबा सैय्यद लष्कर शाहा शहीद रहमतुल्ला अलैह यांच्या उर्सचे आयोजन करण्यात आले होते.

दि. १६ मार्च रोज सोमवारला मध्यरात्री १.५५ वाजता मजारला (समाधी) घुस्ल (तीर्थ) देऊन उर्सला सुरुवात झाली. १७ मार्च रोजी मंगळवारला सकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. सायंकाळी महारकुंड वस्तीतून शाही संदल काढण्यात आला. शाही संदल गावाची गस्त करीत महारकुंड चौकी येथील दर्गा येथे पोहोचला.

त्यानंतर श्री संत बाबा ताजुद्दीन दर्गा ट्रस्ट, वाकीचे अध्यक्ष प्रभाकर डहाके पाटील, हजरत बाबा सैय्यद लष्कर शाह शहीद र. अ. सेवा ट्रस्ट, महारकुंडचे अध्यक्ष प्रज्वल महेश बुरडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मजारावर चादर चढविण्यात आली. आणि देशासाठी शांतता व सुव्यवस्था, प्रेम भवणेसाठी दुआ करण्यात आली. त्यानंतर लंगरचे (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले होते. लंगरचा शेकडो भाविकांनी आस्वाद घेतला. गुरुवार दिनांक १८ मार्च रोजी सकाळी कुल शरीफची फातेहा होऊन बाबांच्या उर्सचे समापन झाले. अनेक भाविकांनी बाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला.

आयोजनाकरिता प्यारु शेख, अनुराग विलासराव बुरडे, शकूर शेख, इस्माईल (बब्बु बावा) शेख, साकीर शेख, नारायण लांबट, रोशन कामडी, आसिफ शेख, प्रशांत नरड (जावई) मु. आंजी, जाकीर शाह, शब्बीर बाबा मलंग आदींच्या विशेष सहकार्याने उर्सचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनासाठी खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे तसेच पेंच व्याघ्र प्रकल्प अधिकारी प्रविण लेले यांनी चोख व्यवस्था ठेवली. त्यानिमित्ताने आयोजकांनी ठाणेदार भुजाडे व लेले यांचे आभार मानले.

यावेळी पियुष बुरडे, नामदेव गजभिये, मकसुद शेख, फैज शेख, महेबूब शेख, यासिन पठाण, जब्बार शेख, अफसर शेख, अक्षय प्रशांत डवले, युनूस अली, युनुस कुरेशी, सईद कुरेशी, रामु बोकडे, आसिफ (तोसिफ) शेख यांच्यासह शेकडो भक्तगण उपस्थित होते. उर्सच्या यशस्वीतेसाठी दर्गा कमिटीचे सदस्य व खापा शहरवासीयांनी प्रयत्न केले.

Popular Articles