– काँग्रेसकडून रमेश कारामोरे, शिवसेनाकडून नलिनी चौधरी स्वीकृत सदस्य
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- नगरपरिषदेत शुक्रवार (दि.१६) जानेवारी रोजी उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे आलोक मानकर व काँग्रेसच्या शीतल गजभिये यांच्यात थेट लढत झाली. रामटेक नगरपरिषदेत शिवसेनेचे ८ नगरसेवक व नगराध्यक्ष आणि भाजपाचे ५ नगरसेवक तसेच काँग्रेसचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत. मतदानात भाजप-शिवसेना आघाडीचे उमेदवार आलोक मानकर यांना १४ मते मिळाली, तर काँग्रेसच्या शीतल गजभिये यांना ७ मते प्राप्त झाली. परिणाम स्वरूप निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी राऊत तर पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी आलोक मानकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. तसेच यावेळी काँग्रेसकडून रमेश करामोरे तर शिवसेनेकडून पूर्व नगराध्यक्ष नलिनी चौधरी यांची स्वीकृत सदस्य म्हणून घोषणा करण्यात आली. या प्रसंगी सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी पल्लवी राऊत तसेच नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. नगरपरिषदेच्या वतीने सर्व नवनिर्वाचित व उपस्थित नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले.








