कामठी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे ५३ वे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार ता. १ फेब्रुवारी रोजी लोकमान्य बाळ गंगाधर चेंबूर, मुंबई येथे होणार आहे.
महामंडळाच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये शिक्षकेतर बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर विचारविनिमय, चर्चासत्र, परिसंवाद होणार असून यामध्ये अनेक तज्ञ विचारवंतांचे मार्गदर्शन होणार आहे, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षक आमदार विक्रम काळे, जयंत आसगावकर, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थीत राहणार आहेत, राज्यातील शिक्षकेतर बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महामंडळ शिवाजीराव खांडेकर यांनी केले आहे. महामंडळाच्या ते म्हणाले महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर संघटनांचे सरकार्यवाह राज्यव्यापी तसेच वैद्यकीय, रजा देयके असे अनेक प्रश्न शासन दरबारी अधिवेशनासाठी राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, आश्वसित प्रगती योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, अनुकंपा तत्वावरील पदांची नियुक्ती, जुनी पेन्शन योजना प्रलंबित आहेत. यावर चर्चा आणि विचारविनिमय आणि संघटनेची पुढील ध्येय धोरणे ठरविली जाणार आहेत. या अधिवेशनाला राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आपल्या नागपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकेतर बांधवांनी या अधिवेशनाला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष सुभाष आष्टीकर, माजी नागपूर विभागीय कार्यवाह मनोज पराते, उमेश शेंडे, सतिश दहाट, कविश्वर खडसे, विशाल सावरकर, राकेश उमरेडकर, प्रीती काळी, रॉबिन मोरडे, गणेश मानकर, सुरेश हलमारे, सुनिल जैस्वाल, योगेश कडु, राजू मोहतकर, हेमराज धानोरकर, प्रशांत मुन, नदीम काजी इत्यादींनी केले आहे.








