– शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तंत्र प्रदर्शन
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- कवी कालिदास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रामटेक या संस्थेमध्ये नुकतेच (दि.१७) जानेवारी ला तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन नगरपरिषद रामटेकचे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं. खैरी बिजेवाडा चे सरपंच रणवीर यादव, एकलव्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य बोरीकर, संस्थेचे प्राचार्य आनंद वाळके, नवनियुक्त नगरसेवक तथा इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होते. या प्रदर्शन कार्यक्रमामध्ये संस्थेतील विद्यार्थ्यांनी निदेशकांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन मॉडेल तयार करून तंत्र प्रदर्शनामध्ये सादर करत व्यवसायातील उपलब्ध यंत्रांची माहिती सुद्धा सर्व पाहुण्यांना करून दिली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सदर तंत्र प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवून कार्य केले. संस्थेचे गटनिदेशक धारपुरे सर तथा चैताली यांच्या मार्गदर्शनामध्ये संस्थेतील सर्व निदेशकांनी सुनियोजित पद्धतीने कार्यक्रम पार पाडण्यास सहयोग दिला. परिवहन विभागाकडून प्रशिक्षणार्थ्यांना रोड सेफ्टी बाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शिंपी तथा प्रास्ताविक जुलमे यांनी केले. प्राचार्य आनंद वाळके यांनी संस्थेतील उपस्थित सर्व पाहुण्यांचे, कर्मचाऱ्यांचे तथा विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी गटनिर्देशक धारपुरे, चैताली, साठवणे, जुल्मे, बिसणे, शिंपी, देवरे, बावणे, शेंडे, धमगाये, भगत, पोहणे, हटवार, मिरगे, मेंदूले, कार्यालयीन कर्मचारी रूपाली चाटे, युवराज, शितल व सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी आदी उपस्थित होते.
पूर्वी उच्चतंत्र व तंत्रज्ञान हे एकाच प्रवाहात: न. प. अध्यक्ष
या तंत्रप्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेली यंत्रे व आधुनिक तंत्रज्ञानाविषयीची आवड, कल्पकता आणि कौशल्ये पाहून निश्चितच समाधान वाटले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी स्वतःला विकसित करून समर्थ व शाश्वत भारताच्या उभारणीत योगदान देऊ शकतात, आणि याचा निश्चितच त्यांना भविष्यात मोठा लाभ होणार आहे. पूर्वी उच्चतंत्र व तंत्रज्ञान हे एकाच प्रवाहात होते; परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात तंत्रविज्ञान क्षेत्राला स्वतंत्र आणि सक्षम दिशा देण्यात आली आहे.




