गडचिरोली :- सन 2025-26 करीता पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना नुतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यत नुतनीकरण अर्ज सादर केला नाही, अशा विद्यार्थ्यांनी 31 जानेवारी 2026 पर्यत अर्ज सादर करावेत. दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यत नुतनीकरणास पात्र विद्यार्थ्याचे अर्ज प्राप्त न झाल्यास त्यांच्या जागी नवीन विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी प्रशासन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अरुण एम. यांनी कळविले आहे.








