– ९० हून अधिक नागरिकांचा सहभाग; घरातूनच कचरा विलगीकरणाचा संकल्प
हिंगणा :- वानाडोंगरी परिसरातील शिवाजीनगर, प्रभाग क्रमांक १० येथे चिंतन एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड अॅक्शन ग्रुप आणि CFSD सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चार प्रकारच्या कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी ओला, सुका, घातक व स्वच्छताविषयक कचरा स्वतंत्रपणे जमा करण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. घरातूनच कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, तर सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर शक्य होतो. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासह परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्यास मदत करण्याचे आवाहन चिंतनचे प्रमुख डॉ. विलास येवले यांनी केले .या उपक्रमात ९० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. नागरिकांनी नियमित कचरा विलगीकरण आणि परिसर स्वच्छतेचा संकल्प केला.






