spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गौंडखैरीत हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाड

– ११ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त

कळमेश्वर :- नागपूर ग्रामीण जिल्हयात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मा. श्री. हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण, श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आणि श्री सागर खर्डे, सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागिय पोलस अधिकारी, सावनेर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २०/११/२०२६ रोजी कळमेश्वर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने मौजा गोंडखैरी पारधी बेडा येथे संयुक्तपणे मोठी कारवाई केली.

कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी पारधीबेडा येथे अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत कळमेश्वर पोलीसांनी २६४०० लिटर सडवा, २१० लिटर मोहाफुल दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १०,११,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी १५ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये एकुण १५ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने ८ गुन्हे नोंदवून ४८६० लिटर रसायन सह एकुण १,८६,७००/- रूपयंचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही विभागांच्या संयुक्त कारवाईत एकूण ११,९८,४००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला आहे.

Popular Articles