– मोवाड येथे कार्तिक मासानिमित्त होणाऱ्या काकड आरतीने भक्तिमय वातावरण
मोवाड :- उठा उठा हो सकळीक , वाचे स्मरावा गजमुख !
रिध्दि सिध्दिचा नायक , सुखदायक भक्तांसी !!
भल्या पाहटे मंदिरातून येणारे सुर कानी पडताच प्रसन्नता अनुभवास येते. ग्रामीण भागात कोजागीरी पोर्णीमेच्या दुसऱ्या दिवस पासून काकड आरती ला सुरुवात झाली आहे. संपूर्ण गावात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली आहे.
आश्विन शुध्द चतुर्दशी कोजागिरी पोर्णिमेनंतर दुसऱ्या दिवसपासून कार्तिक मासाला सुरुवात झाली. दरवर्षी प्रमाने कार्तीक मासाचा शुभारंभ होताच मोवाड शहरातील विविधा मंदिरात काकड आरतीला सुरुवात झाली आहे. पहाटेच्या प्रहारी मंदिरातील घंटारव आणि काकड आरतीचे स्वर गुजायला लागले आहेत. यामध्ये आध्यात्मिक संस्कार पुढील पिढीकडे रुजले जावे आणि संस्कृती परंपरेनुसार चालत रहावी हा त्या मागचा उद्देश आहे. एकतर अध्यात्माकडे युवकांचा कल वाढावा. या उद्देशाने शहरात कोजागिरी पोर्णिमेनंतर जपली जाणारी काकड आरतीची परंपरा आहे.
आरोग्यासाठी उत्तम काळ
हिवाळ्यात आल्हाददायी वातावरण असते. पाहटेच्या वातावरणात अॉक्सिजनचे प्रमाण अधिक असते. या वातावरणामुळे मानवाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. त्यामुळे पाहाटे पाच वाजताच्या सुमारास काकड आरतीची गुंज काणावर येते. भक्तगण पहाटेची घराचीकामे आटोपून अंघोळ करून मंदिरात गोळा होतात. आणि सगळीवडे काकड आरतीचा मंजुळ स्वर गाजतो. शहरातील विविध मंदिरात काकड आरतीला भाविकांची मोठी गर्दी असते.






