देवलापार :- देवलापार पोलीस अवैध धंदयांवर कारवाई कामी पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी ट्रॅक्टर ट्रॉलीचा शोध कामी सर्तक पेट्रोलींग केली असता मौजा फुलहारी फाटा शिवार येथे नाकाबंदी केली असता संशयीत ट्रॅक्टर हे ट्रॉलीसह मिळुन आले. वाहन थांबवुन पाहणी केली असता ट्रॅक्टर ट्रॉली हे विनाक्रमांकाचे असल्याचे दिसले. सदर वाहन चालकाला नाव पत्ता विचारला असता, कृष्णा महागु शेरकी, वय ५५ वर्ष, रा. टांगला, ता. रामटेक अशी माहीती प्राप्त झाली. त्याला परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्या कडे परवाना नव्हता. वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली.
पोलीसांनी पंचासमक्ष विनाक्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली मधुन १) ०१ ब्रास रेती किंमती ५,०००/- रूपये आणि २) विनाक्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली किंमती ७,५०,०००/- रूपये असा एकुण ७,५५,०००/- रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. नमुद आरोपी यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) भान्यासं, सह कलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमचे कलम ४८ (७), ४८(८), सहकलम ४, २१ खान व खनिजे अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






